कोरे महाविद्यालयात सुविधा केंद्र सुरू करण्यास शासनाची मंजुरी- प्राचार्य बिराजदार
कोडोली प्रतिनिधी:-
वारणानगर ता.पन्हाळा येथील तात्यासाहेब कोरे महाविद्यालयास पॉलिटेक्निकसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनमान्य सुविधा केंद्राची सुरू करण्यास परवानगी मिळाली आहे.
या सुविधा केंद्रावरती दहावी पास विद्यार्थ्यांना व बारावी सायन्स पास विद्यार्थ्यांना महाराष्ट्र् शासनाचे पॉलिटेक्निक प्रवेशाचे प्रथम वर्षासाठी व थेट दुसऱ्या वर्षासाठी नोंदणी अर्ज विक्री सुरू असून, सर्व विद्यार्थ्यांचे रजिट्रेशन फार्म भरून घेतले जाणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांचे कागदपत्रे तपासणी करून रजिट्रेशन कन्फर्म केले जाणार आहे. ही सर्व सुविधा मोफत देणार असल्याचे प्राचार्य बी.व्ही.बिराजदार यांनी सांगितले.