फटाक्याचा रॉकेट गळ्याजवळ फुटल्याने एका मुलाचा मृत्यू
कोल्हापूर : फटाक्यातील रॉकेट गळ्याजवळ फुटल्याने १३ वर्षीय आदित्य चा भाजून मृत्यू झाला आहे. या घटनेची कऱ्हाड पोलिसात नोंद करण्यात आली आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली सविस्तर हकीकत अशी कि, आदित्य शामराव थोरात हा मुलगा कऱ्हाड तालुक्यातील कालवडे इथं राहणारा होता . त्याच्या घराशेजारी वाढदिवसाचा कार्यक्रम संपन्न होत होता. ते पाहण्यास आदित्य गेला होता. वाढदिवसाच्या कार्यक्रमानंतर फटके वाजवण्यात आले. याचवेळी आदित्यनेही एक रॉकेट पेटवला, तो आकाशात जावून फुटला. परत दुसरा रॉकेट त्याने लावला. परन्तु बराचवेळ वाट पाहून तो आकाशात न उडाल्याने ,ते पाहण्यासाठी आदित्य गेला असता, अचानक रॉकेट उडाला आणि त्याच्या गळ्याजवळ फुटला. यामुळे आदित्य गंभीर रित्या भाजून जखमी झाला. त्याला, त्याच्या नातेवाईकांनी उपचारार्थ रुग्णालयात नेले. परंतु त्या अगोदरच त्याचा मृत्य झाला होता.