इस्लामपूर च्या स्नेहल चव्हाण ची यशस्वी वाटचाल
तुरुकवाडी (प्रतिनिधी) : इस्लामपूर तालुका वाळवा येथील स्नेहल चव्हाण या अभिनेत्रीने आपली अभिनय क्षेत्रातील वाटचाल यशस्वीरित्या पुढे चालू ठेवली असून, ग्रामीण भागातील या युवतीने आता चित्रपट क्षेत्रात पदार्पण केले आहे.
स्नेहल जाधव हिचे शालेय शिक्षण नानासाहेब महाडिक विद्यालय इस्लामपूर इथं झालं असून, ती इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे. या अगोदर तिने लोकमान्य, काय झालं कळेना, सून असावी अशी, भुताचा हनिमून आदि मराठी चित्रपटात अभिनय केला आहे. तसेच तुझ्यात जीव रंगला,फांदी या मालिकांमधून काम केले असून, आगामी पद्मावती सिनेमा मध्ये दीपिका पदुकोन ची दासी चा अभिनय केला आहे. त्याचप्रमाणे शंभूराजे या नाटका मध्येही भूमिका केली आहे. यासाठी साळुंखे मामा,वेदांत बनसोडे यांनी तिला सहकार्य केले आहे.