शेतकरी संपाची ‘ वाडीचरण ‘ इथं पहिली ठिणगी
बांबवडे : १जुन पासून सुरु झालेल्या शेतकरी संपाला वाडीचरण तालुका शाहुवाडी इथून ठिणगी पडली आहे. इथल्या शेतकऱ्यांनी गोकुळ संघाचा दुधाचा टेम्पो अडवला.
१जुन पासून पुनतांबे जिल्हा अहमदनगर येथील शेतकऱ्यांनी केलेले संपाचे आवाहन महाराष्ट्रातील सर्वच शेतकऱ्यांनी स्वीकारले असून, शाहुवाडी तालुक्यात आज पहिली ठिणगी पडली आहे. वाडीचरण येथील शेतकऱ्यांनी गोकुळ दुधाचा टेम्पो अडवला. दुधाचे काही नुकसान केले नाही. पण यावर अधिक गाजावाजा झाला असता, तर मात्र अनर्थ घडला असता. येथील शेतकऱ्यांनी संयम राखून केवळ टेम्पो अडवून, आपली भावना इथल्या शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
यावेळी रामभाऊ लाड, शामराव मोहिते, दिनकर शेटे, श्रीकांत जवंदाळ, आदिनाथ भावके, शरद पाटील, दत्ता सावत, दत्ता लाड, बाळकृष्ण लाडव ग्रामस्थ उपस्थित होते.
???शेतकरयला हामी भाव मिलालाच पाहिजे???
Thanks for comment.