बुकिंग असतानाही खासदार शेट्टी यांना न घेताच ‘जेट एअरवेज ‘ चं उड्डाण
मुंबई : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांचं ‘जेट एअरवेज ‘ चं बुकिंग असतानाही त्यांना न घेताच ‘जेट एअरवेज ‘ च्या विमानानं उड्डाण केलं.बरं इथंपर्यंत ठीक म्हणू या, परंतु दुसऱ्या विमानाच्या प्रवासासाठी राजू शेट्टी यांच्याकडे कंपनीने अधिक रुपयांची मागणी केली. या सर्व प्रकाराने राजू शेट्टी संतापले. एकूणच काय विमान कंपन्यांचा उद्दामपणा आज पुन्हा एकदा समोर आला आहे. मागे सेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांच्याबाबत या विमान कंपन्यांनी खूप आगपाखंड केली होती. परंतु खासदार शेट्टी यांनासुधा यांच्या उद्दामपणाचा आज अनुभव आला.
राजू शेट्टी हे आज सकाळी मुंबईहून दिल्लीला जात होते. जेट एअरवेजचं बिझनेस क्लासचं तिकीट त्यांनी काढलं होतं. विमान उड्डाणाच्या तासभर आधीच ते विमानतळावर पोहोचले होते. विमानतळावर त्यांनी बोर्डिंग पासही घेतला होता. मात्र, प्रवासाला वेळ असल्याने शेट्टी लाउन्जमध्ये येऊन बसले. बराच वेळ होऊनही विमान उड्डाणाबाबत काहीच सूचना न मिळाल्यानं त्यांनी बाहेर येऊन चौकशी केली. तेव्हा, विमानाचं उड्डाण झाल्याचं त्यांना समजलं. तरीही, त्यांनी शांतपणे जेट अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि पुढच्या विमानानं दिल्लीपर्यंत पोहोचण्याची व्यवस्था करून देण्याची मागणी केली. त्यावर, जेटनं आपली चूक नसल्याचा आव आणला.
दरम्यान शेट्टी यांना दिल्ली ला जाणे गरजेचे होते, म्हणून अधिक चे पैसे देवून त्यांनी प्रवास केला. ंपरतू विमान कंपन्यांच्या उद्दामपणांला वेसंण घालणं गरजेचं होवू लागलं आहे.