भाजप च्या सौ.सूर्यवंशी यांचा तक्रार अर्ज फेटाळला
शिराळा : शिराळा नगरपंचायत नगराध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सौ. सुनंदा सोनटक्के यांच्या विरोधात भाजपाच्या नेहा सूर्यवंशी यांनी केलेला तक्रार अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र जाधव यांनी फेटाळला.
त्यामुळे सुनंदा सोनटक्के यांचा नगराध्यक्षपदाचा मार्ग मोकळा झाला आहे.
काल ७ जूनला भाजपा च्यावतीने नेहा सूर्यवंशी, सीमा कदम तर राष्ट्रवादी कडून सुनंदा सोनटक्के यांनी उमेदवारी अर्ज निवडणुक निर्णय अधिकारी प्रांताधिकारी राजेंद्र जाधव यांचेकडे दाखल केला आहे.
छाननीत तिन्ही अर्ज वैध झाले आहेत. प्रभाग क्रमांक ४,६,१५ हे नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री साठी राखीव असल्याने त्या प्रभागातून निवडून आलेल्याचे अर्ज वैध ठरवावेत. राष्ट्रवादीच्या सुनंदा सोनटक्के त्या प्रभागातू निवडून आल्या नसल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरवावा, अशी तक्रार भाजपच्या नेहा सूर्यवंशी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र जाधव यांचेकडे केली होती. त्यावर आज ( ता.८) गुरुवारी सकाळी ११ वाजता सुनावणी झाली. त्यावेळी सूर्यवंशी यांचा अर्ज फेटाळण्यात आला. यावेळी तहसीलदार दीपक शिंदे, मुख्याधिकारी ए. के. कुंभार उपस्थित होते.
शिराळा नगरपंचायतमध्ये राष्ट्रवादीचे ११ तर भाजपाचे सहा उमेदवार निवडून आले आहेत. या नगरपांचायतमध्ये राष्ट्रवादीची सत्ता असल्याने व सुनंदा सोनटक्के यांचा एकच अर्ज असल्याने त्यांची नगराध्यक्ष म्हणून निवड निश्चित झाली आहे.अधिकृत घोषणा १५ जूनला होणार आहे.