शिराळ्याच्या नगराध्यक्षा सौ. सोनटक्के, तर उपनगराध्यक्ष कीर्तीकुमार पाटील
शिराळा : शिराळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी सुनंदा सोनटक्के तर उपनगराध्यक्षपदी किर्तिकुमार पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांताधिकारी राजेंद्र जाधव यांनी काम पहिले. यावेळी तहसीलदार दीपक शिंदे, मुख्याधिकारी अशोक कुंभार उपस्थित होते.
शिराळा नगरपंचायतवर १७ पैकी ११ जागा मिळवून राष्ट्रवादीने एकहाती सत्ता मिळवली आहे. नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी कडून सुनंदा सोनटक्के यांचा एकच तर भाजपाने नेहा सूर्यवंशी व सीमा कदम यांचे दोन अर्ज दाखल केले होते. सूर्यवंशी व कदम या दोघींची अर्ज माघारी घेतल्याने सुनंदा सोनटक्के बिनविरोध निवडून आल्या.
उपनगराध्यक्षपदासाठी किर्तिकुमार पाटील यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली.
नूतन नगराध्यक्षा सुनंदा सोनटक्के यांचा सत्कार मानसिंगराव नाईक तर उपनगराध्यक्ष किर्तिकुमार पाटील यांचा सत्कार भगतसिंग नाईक यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी आमदार मानसिंगराव नाईक, विराज नाईक, पंचायत समिती उपसभापती सम्राटसिंह नाईक, भगतसिंग नाईक, विश्वास कदम, विजयराव नलवडे, राजू निकम, देवेंद्र पाटील, डी.जी.अत्तर, के.वाय. मुल्ला, संपतराव शिंदे, लालासाहेब तांबीट, बसवेश्वर शेटे, प्रताप कदम, सुनील कवठेकर, सागर नलवडे, गजानन सोनटक्के, नगरसेवक विजय दळवी, गौतम पोटे, मोहन जिरंगे, संजय हिरवडेकर, सुनीता निकम, प्रतिभा पवार, अर्चना शेटे, आशाताई कांबळे, सुजाता इंगवले उपस्थित होते.