विराज इंडस्ट्रीज मध्ये वृक्षारोपण
शिराळा : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त येथील विराज इंडस्ट्रीज मध्ये माजी आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
वृक्षारोपण करण्याबरोबरच त्याचे संवर्धन करणे, हि काळाची गरज आहे, असे मत मानसिंगराव नाईक यांनी व्यक्त केले.
पर्यावरण दिनानिमित्त आयोजित वृक्षारोपण समारंभात ते बोलत होते. यावेळी विराज चे संचालक विराज नाईक , जनरल मॅनेजर युवराज गायकवाड यांच्या हस्ते विराज अल्कोहोल्स, विराज कॅटलफिल्ड, विराज रिफायनरी येथे वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी युवराज गायकवाड म्हणाले कि, या इंडस्ट्रीज च्या कार्यस्थळावर गेल्या दहा वर्षापासून पर्यावरण दिन, माजी आमदार मानसिंगराव नाईक, संचालक विराज नाईक यांचा वाढदिवस , असे वर्षातून तीन वेळा वृक्षारोपण करण्यात येते.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस चे तालुका अध्यक्ष विजयराव नलवडे, प्रवीण शेटे, यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.