विश्वास पाटील ( पानिपतकार ) यांच्यावर FIR दाखल करा – कोर्टाचे आदेश
मुंबई : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणा चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी, व मुंबई उपनगर जिल्ह्याचे माजी जिल्हाधिकारी कादंबरीकार विश्वास पाटील व त्यांची पत्नी चंद्रसेना पाटील यांच्यावर ‘एफआयआर ‘ दाखल करण्याचे आदेश सत्र न्यायालयाने आज दिले आहेत. नियमबाह्य पद्धतीने विकासकांना मदत केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. म्हणून न्यायालयाने हे आदेश दिले आहेत.
विश्वास पाटील यांनी एसआरएच्या सीईओपदावर असताना शेवटच्या महिन्यात मोठ्या प्रमाणात फायली हातावेगळ्या केल्याने त्याची चौकशी सुरू आहे. असे असतानाच दोन विकासकांना नियमबाह्य पद्धतीने मदत केल्याच्या प्रकरणात पाटील गोत्यात आले आहेत.
रामजी शहा व रसेश कनकिया या दोघांना मालाडमधील प्रकल्पांमध्ये नियमबाह्य त्यांना मदत केल्याचा आरोप लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आली आहे.