उदय साखर कर्मचाऱ्यांचा आक्रोश्मय रास्ता रोको
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी येथील उदय सखर (अथणी शुगर्स ) च्या जमीनधारक कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आज कारखाना कार्य स्थळाकडे जाणारा रास्ता, रस्त्यावर चर मारून आडवून धरला .यावेळी कारखाना प्रशासानाकडून कोणीही या कर्मचाऱ्यांची दखल घेतली नाही. दुपारनंतर अधिकाऱ्यांनी केवळ निवेदन स्वीकारले.हे इथल्या भूमिपुत्रांचे शल्य आहे.
दरम्यान गेली १० वर्षे या मंडळींना तुटपुंजा पगारावर राबावे लागत आहे. त्यामुळे येथील कामगार वर्ग संतापला आहे.दरम्यान येथील जमीनधारक असलेल्या काही कर्मचाऱ्यांना अद्यापही कायम स्वरूपाचे आदेश दिले गेलेले नाहीत.त्यांना आदेश लेखी स्वरुपात मिळावेत, अशी त्यांची मागणी आहे. तसेच साखर संघ कामगार आयुक्त सो यांच्या नियमानुसार वेतनवाढ मिळावी, अथवा मसिक१५०००/- रु. वेतनवाढ मिळावी. तसेच त्याना हुद्द्यानुसार वेतनवाढ देखील मिळावी.
दरम्यान कारखान्यातील काही अधिकारी जमीनधारकांना सापत्न भावाचीवागणूक देतात. अशा अधिकाऱ्यांची तत्काळ बदली करावी .तसेच या अगोदर केलेल्या प्रलंबित मागण्या देखील पूर्ण कराव्यात. याबद्दल जे काही निर्णय होतील, ते लिखित स्वरुपात कारखाना प्रशासनाने द्यावे. अशा मागण्या जमीनधारक कर्मचाऱ्यांच्या आहेत. या मागण्या पूर्ण न झाल्यास उग्र आंदोलनाचा पवित्रा नाईलाजास्तव घ्यावा लागेल. यातून होणाऱ्या नुकसानीस कारखाना प्रशासन जबाबदार राहील . अशा आशयाच्या सूचना कारखाना प्रशासनास देण्यात आल्या आहेत.