आज कोडोली बंद ठेवून शेतकरी आंदोलनाला पाठींबा
कोडोली प्रतिनिधी:-
वारणा-कोडोली ता.पन्हाळा परिसरात आज शेतकरी बांधवांनी पुकारलेल्या बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. या परिसरात व्यापारी तसेच शेतकरी बांधवांनी आज कडकडीत बंद पाळला. सर्व दुकाने ,तसेच व्यापार आज दिवसभर बंद ठेवण्यात आले आहे..कोडोली मधील छत्रपती चौकात आज सकाळी शेतकरी बांधवांनी आपल्या जवळचे दूध रस्त्यावर फेकण्यापेक्षा त्यांनी त्या दुधाचा अभिषेक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला केला.