रजपूत वाडी जवळ अपघात : दोन ठार
रजपूतवाडी ता.करवीर येथील पेट्रोल पंपाजवळ संजीवन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पन्हाळा च्या बस खाली दुचाकीस्वार आल्याने झालेल्या अपघातात दुचाकी वरील पिता-पुत्र जागीच ठार झाले.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार रजपूत वाडी जवळ आज सकाळी आठ ते नऊ वाजनेच्या दरम्यान दोन दुचाकी गाड्यांचा अपघात झाला, दरम्यान संजीवन कॉलेजची बस कोल्हापूर हून पन्हाळा दिशेकडे येत होती.दरम्यान दुचाकींच्या अपघातात एका दुचाकीवरील पंडित श्रीपती गोळे,(वय ३५ वर्षे) त्याचे वडील श्रीपती बाबू गोळे( वय ६५ वर्षे) हे दोघे संजीवन च्या बस खाली आल्याने जागीच ठार झाले. बस मधील विद्यार्थ्यांना काहीही झालेले नाही.